टू कुक ऑर नॉट टू कुक ….दॅट इज द क्वेश्चन…..
खावं की खाऊ घालावं हाच एक सवाल आहे….
ह्या किचनच्या ओट्यावर तळण्याचा भाजण्याचा लाटण्याचा मळण्याचा भाग होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?? की फेकून द्यावं भांड्यांचं हे लख्तर त्यात अडकलेल्या जुन्या पाककृतीच्या आठवणींसकट भांड्यांच्या दुकानाच्या काळ्याशार डोहामध्ये ???
आणि करून टाकावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने??
पोळपाटाचा…..लाटण्याचा….. कढईचा …..
अन तव्याचाही …
कामवाल्या बाईच्या महानागिणीने सुट्टी घेऊन असा डंख मारावा …. की सर्व कामे एकटीने करून नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही….
पण मग…
पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वैपाक करण्याचं स्वप्न पडु लागलं तर….?
तर…..?
इथेच मेख आहे…
नव्या पदार्थांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही… म्हणुन आम्ही असंच सहन करतोय जुनं जागेपण..
सहन करतो आहोत एका पदार्थानंतर दुसरा पदार्थ बनवत बसतांना येणारा थकवा……
आणि अखेर करुणेचा कटोरा आणि भरलं ताट घेऊन उभ्या राहतो आम्ही गृहिणी…
खालच्या मानेने आमच्याच खाणेक-यांच्या दाराशी….
विधात्या…
तू इतका कठोर का रे झालास???
एका बाजूला जो कांदा आम्ही चिरला तो आम्हाला रडवतो…
आणि दुसऱ्या बाजूला
ज्याच्या साठी स्वैपाक केला तो नवरा तोंड वाकडं करून खुशाल ताटावरून उठून जातो….
मग ते भरलं आणि उरलं ताट घेऊन हे करुणाकरा…
आम्हा सारख्या सुगरण गृहिणींनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायचं….??
कोणाच्या पायावर ??
कोणाच्या ??
कुणी कामवाली बाई देतं का….?? कामवाली बाई????
एका तुफानी गृहिणीला ..एक कुशल कामवाली बाई देतं का???
स्वैपाकाचे अनंत प्रकार करून भरलेला ओटा आवरायला ….
कुणी कामवाली बाई देतं का??
ही गृहिणी भांडेवाल्या बाईवाचून……पोळीवाल्या बाई वाचून….माणसाच्या मायेवाचून… देवाच्या दयेवाचून…
किचनच्या ओट्याजवळ राबतेय….
जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा शोधतेय …..कुणी कामवाली बाई देतं का….??
खरंच सांगते बाबांनो
ही गृहिणी आता थकून गेलीये….
भांडी घासत, भाजी चिरत ,
अर्धी-अधिक तुटून गेलीये,
फोडणी घालत …,
खोबरं खवत ..
गाजर किसत
ही गृहिणी आता थकलीये….
खरंच सांगते,
गृहिणीला गृहिणीपणच नडतय रे,
हे.. बाबा.. कुणी कामवाली बाई देता का रे?
गृहिणीला महाल नको,
राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको,
थैली मधली भेट नको,
फक्त किचनमध्ये हवा एक एसी
घाम न येण्यासाठी …
एक हवी आराम खुर्ची..
गृहिणीला बसण्यासाठी,
आणि हवा एक कप चहा….
थकल्या शरीराला चैतन्य देण्यासाठी…
कुणी कामवाली बाई देता का रे? कामवाली ???
Tufaan 👌👌😂
Thanks😊
Katu satya… Kharach koni kamewali dhya… Kalachi garaj jaliy… Kamwali.. Gruhini cha aadhar jaliy
😀
Mast!
धन्यवाद!