संध्याकाळी पावणे सहा वाजले तशी मृणाल प्रीती जवळ आली आणि म्हणाली,”प्रीती लक्षात आहे न? आज आपल्याला शॉपिंगला जायचय. आज शार्प सहाला ऑफिस सोडूया प्लीज.” “हो आहे लक्षात…. एवढं संपवते …. ईओडी मेल कर असं सांगून गेलेयत सर…सो फक्त दोन मिंट दे मला. तू रेडी रहा. मी आलेच.” “ठीके.” म्हणत मृणाल निघून गेली. मृणालचं लग्न पुढच्या…
सात एकावन्न डोंबिवली- भाग ३
आता प्लॅटफॉर्म बऱ्यापेकी भरलेला. ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली तशी बायकांनी पदर खोचला, ओढण्या बांधल्या, पुरुषांनी सॅक पुढे लावली. त्या गर्दीत विनोद आणि प्रीतीही मिसळून गेले. विनोदने जवळजवळ धावती ट्रेन पकडून आत जाऊन सीट मिळवली. आता दादर येईपर्यंत चिंता नाही…. गेम खेळा , laptop उघडून काम करा नाहीतर सरळ झोपा….. काहीही करायला स्कोप होता. एक तासाची…
सात एकावन्न डोंबिवली भाग २
तीला बाय करून विनोद त्याच्या नेहमीच्या डब्याजवळ जायला वळला, त्याच्याच कंपनीतल्या एका मित्रा सोबत तो रोज सात एकावन्न पकडायचा….. ते दोघे आणि अजून चौघे असा मस्त ग्रुप होता त्यांचा … सगळ्या एज मधले लोक होते त्यांच्या ग्रुप मध्ये …त्यामुळे धमाल असायची ,प्रवास मजेत जायचा गप्पा मारत कधी दादर यायचं कळायचंच नाही. आज नेहमीची लोकल…
सात एकावन्न डोंबिवली -भाग १
गॅलरीतुन आईने जोरात हाक मारली. “विनोद, अरे डबा विसरलास” विनोदच्या कानावर पडलं पण आज सॉलिड लेट झालेला, त्यात बाईक लावायला हवी तशी जागा मिळत नाही, रोज पार्किंगची मारामारी असते मानपाडावर सकाळी सकाळी… त्याने ऐकलं न ऐकल्यासारखं करून फक्त “राहू दे आता …खाईन कॅन्टीनमध्ये काहीतरी……मी निघतो ग प्लिज आता ….बाय” ओरडला वरून आई: “ थांब…
गीता जीपीटी
हो बरोबर वाचलंत ! चाट जीपीटी येऊन क्रांती घडते ना घडते तो पर्यंत गीता जीपीटी, काहीशा वेगळ्या विषयाला घेऊन धडकलं आहे आणि त्याच गतीने क्रांती करू पाहत आहे. मंडळी, आजच आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी , चांद्रयान-३ बद्दल सर्वच वैज्ञानिकांचे आपण सर्वानी मनापासून अभिनंदन केले. खरे पाहता तंत्रज्ञानाची ही गगन भरारी अतिशय आनंददायी…
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
काही काही वेळा पुस्तकं एकाच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतात. अर्थातच त्या मागे त्या लेखकाचा त्या गोष्टीमागचा अभ्यास, संशोधन, त्याचे विचार, त्याने आत्मसात केल्यानंतर त्यातल्या प्रक्षिप्त गोष्टी या आल्याच. पण त्यानिमित्ताने, विशेषकरून इतिहासाकडे निर्भेळ दृष्टीने बघायला आपण शिकायला हवं हे मला कालांतराने जाणवू लागलं. आणि म्हणूनच, माझ्या मनात ठाम विचार असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही लेखन आढळल्यास…
शब्दांच्या पलीकडले
तुम्ही कधी मुक्या माणसांचा आवाज ऐकलाय? काहीही न बोलता सुद्धा फार काही बोलता येतं हे कधी अनुभवलंय? अनेक शब्दांना लाजवील अशी मूक भाषा काल मी पाहीली, ऐकली…समजली सुद्धा ! सध्या जिकडे पहावं तिकडे प्रेमी युगुलांची वीट येईल एवढी मस्ती सुरु असते. पण मग हे लहान मुलांच्या गार्डनमध्ये जे अतिक्रमण करतात त्याने अगदी नकोसं होतं. बरं,…
कृष्ण कुणाचा?
व्यासांनी महाभारतात अनेक उत्तमोत्तम पात्र रचली. प्रत्येकाचा त्या नाट्यातील भाग कमी अधिक प्रमाणात महत्वाचा ठेवला. व्यासांच्या महाप्रतिभेचा महाअविष्कार समजलं जाणारं हे महानाट्य … त्यातील माणसं त्यांनी अशी काही उभी केली, कि केवळ एका दृष्टीत किंवा एका वाचनात देखील ती खोलवर समजत नाहीत. ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात, प्रत्येक वेळी नव्याने कळू लागतात आणि तेव्हाच ती…
किचन सम्राज्ञी – अशी गृहिणी होणे नाही!
टू कुक ऑर नॉट टू कुक ….दॅट इज द क्वेश्चन….. खावं की खाऊ घालावं हाच एक सवाल आहे…. ह्या किचनच्या ओट्यावर तळण्याचा भाजण्याचा लाटण्याचा मळण्याचा भाग होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?? की फेकून द्यावं भांड्यांचं हे लख्तर त्यात अडकलेल्या जुन्या पाककृतीच्या आठवणींसकट भांड्यांच्या दुकानाच्या काळ्याशार डोहामध्ये ??? आणि करून टाकावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?? पोळपाटाचा…..लाटण्याचा……..
मी आणि नथुराम
मागील आठवड्यात ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक घरपोच आलं. त्यावेळी कुरियर आणणारे काका काहीसे वयस्कर होते. भर दुपारी आल्याने घाम पुसत पुसत त्यांनी पाणी मागितलं. आणि दिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘असं विचारणं योग्य नाही, पण आत नक्की काय आहे?’ म्हटलं, ‘पुस्तक आहे’ त्यावर ते म्हणाले ‘चिकार खच येऊन पडलाय, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे.’ मग…