तीला बाय करून विनोद त्याच्या नेहमीच्या डब्याजवळ जायला वळला, त्याच्याच कंपनीतल्या एका मित्रा सोबत तो रोज सात एकावन्न पकडायचा…..
ते दोघे आणि अजून चौघे असा मस्त ग्रुप होता त्यांचा …
सगळ्या एज मधले लोक होते त्यांच्या ग्रुप मध्ये …त्यामुळे धमाल असायची ,प्रवास मजेत जायचा
गप्पा मारत कधी दादर यायचं कळायचंच नाही.
आज नेहमीची लोकल चुकल्याने पुढच्या लोकल मध्ये अजून गर्दी वाढणार आणि दुसरं म्हणजे लॅपटॉप आहे….धक्का लागला तर ते एक टेन्शन
आणि तिसरं म्हणजे एकटच जावं लागणार त्यामुळे अजूनच वैताग आलेला….
इंडिकेटर पाहिलं तर अजून पुढची ट्रेन लावली नव्हती…
तीन नंबर किंवा पाच वर जाऊन फास्ट ट्रेन पकडण्यासाठी सर्कस करायचा तर अजिबात मूड नव्हता.
आता नेक्स्ट डोंबिवली लोकल येई पर्यंत वाट बघायची एवढंच हातात होतं.
आता बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म रिकामा होता, नेक्स्ट ट्रेन साठी हळूहळू लोकं यायला सुरुवात झालेली
त्याला लांबून ती मघाच्ची मुलगी दिसली…
ती पण डोबिवली साठीच थांबलीये बहुदा ….बाकी ट्रेन्स मध्ये चढता येत नाही म्हटलेली……..
तिची थोडी फिरकी घेऊया असं ठरवून तो पुन्हा तिच्या कडे जायला निघाला.
तिने सहज इंडिकेटर कडे पाहिलं तर लांबून तो तिच्याकडे येतांना दिसला. थोडं घाबरायला झालं तिला… आता काय पाहिजे याला असा विचार करत ‘मला काहीच माहित नाही’ असा आव आणत तिने मोबाईल मध्ये पुन्हा डोकं घुसवलं.
तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला “हेल्ल्ल्लो …😊.. ”
“.अंम?????????????? काय आता😒????”
“अगं वैतागतेस का एवढी???😛?”
“मग काय बोलायला आलायस आता???” ती वैतागून म्हणाली.
“ अग्गं ……अगदी सहज बोलतोय मी… गेली का नाहीस fastला…. लेडीज almost रिकामा होता मघाच्या ट्रेनचा…”
“fast ट्रेन?????…….😫 मी स्लो साठी तीनवर पण जात नाही…फक्त डोंबिवली पकडते..“
“का?????? ”
“जा यार…. प्लीज आता….. सॉरी बोललेय नं तुला.. .हिशोब क्लियर झालाय आपल्यातला आता”
“कसला हिशोब😱?”
“सात एकावन्नचा…”
“त्याचा कसला हिशोब??”
“माझ्यामुळे तुझी सात एकावन्न चुकली…. तशी माझीही चुकलीच…. झालं मग …”
“असं कसं झालं???? वा रे वा”
“….मग???अजून काय????”
“व्हाट अबाउट पार्किंग???”
“मिन्स???”
“पार्किंगची उधारी बाकी आहेच अजून”
“………”
“माझ्या जागेवर तू तुझी गाडी लावलीस हे तर मान्य आहे न तुला??”
“मी ऑलरेडी दोनदा तरी तुला सॉरी बोललेय आणि आता पुन्हा बोलते…. सॉरी…पण आता प्लीज पार्किंग पार्किंग करत रडू नकोस….”
“व्हाट द फालतुगिरी यार…”
“मग काय तर?? ”
“तुझ्यामुळे मला लांब जाऊन पे and पार्क मध्ये लावावी लागली गाडी….” आता तो चिडला थोडा
“मग आता काय त्याचे पैसे देऊ म्हणतोस???”
“काय मुलगीयेस यार तू???? डोंबिवलीची वाटत नाहीस….”
“बॉर्न and ब्रॉटप इन डोंबिवली ….. ओके????”
“डोंबिवलीच्या मुली अश्या????????????आपल्या डोंबिवलीचे संस्कार कुठे गेले?? ”
“म्हणजे????”
“नाही नाही ….काही नाही…..”
“एक मिनिट…… मी त्या जागेवरून काढू का गाडी😳???? नाही.. बोल बाबा….”
“😂😂😂😂 हा हा हा हा”
“एवढं ऐकून घेण्यापेक्षा चल… मी लावते पे पार्क मध्ये …..तू आणून लाव त्या ठिकाणी….मग जीव शांत होईल तुझा….”
“हा हाःहा हाःहा हा😂😂😂😂ः”
“नाही तरी सात एकावन्न गेलीच्चे….”
“एवढी चीडतेय्स का पण????????😂”
“तू का बोलतोयस एवढा???? उठ सूट पार्किंग…पार्किंग…पार्किंग….😒”
“हा हा😛…. एक मिनिट… बघ , सकाळी सकाळी ट्रेन पकडायचं टेन्शन असतच त्यात हे additional…. कि आधी आपल्या गाडीची सोय व्हायला हवी…. मग माणूस असतो स्ट्रेस मध्ये…… त्यात तुझासारखे येतात आयतं पार्किंग गिळायला….”
“….😒😒😒……….”
“नाही म्हणजे त्यांचं सॉरी जवळ जवळ पन्नास रुपये पडतं दिवसभरासाठी….”
“अर्र्रे यार….पुन्हा तेच…..”
“हा हा😂…… जस्ट किडिंग रे….. लिव्ह इट ……गमत करायची होती तुझी बाकी काही नाही.”
“ओके….thanks”
“नो मेन्शन….. मी विनोद ताम्हाणे.”
“सॉरी वन्स अगेन….. मी प्रीती देसाई….”
“चल बाय आपली लोकल येतेय बहुतेक…. ही पकडायलाच हवी..”
“हो बाय…. तुझा laptop पण आहे नं सोबत….”
“येस्स…. आणि तुझा पण राईट??.”
“नाही. Actually त्यासाठी पण सॉरी……😩”
“अच्छा…..……”
“आय सेड सॉरी.😩”
“बाय….”
“प्लीज…..😩”
“😂😂अग्गं ट्रेन येतेय…….बाय…..”
“हा हा..ओके…….बाय….. thanks for युअर पार्किंग.😊”
“ते उधार आहे अजून……..बाय😂.”
क्रमशः 😊
#सातएकावन्नडोंबिवली