बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यानंतर अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमुर नाव ठेवल्यावर टीकादेखील केली होती. त्या वेळी मला तैमुरलंग या मध्य युगातील ऐतिहासिक व्यक्ती बद्दल कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे त्या टीकेचे कारण नीटसे समजले नव्हते.
पण गेल्या काही महिन्यांपासून मी भारताच्या इतिहासावरील काही पुस्तकं वाचत आहे. आणि काळाच्या पडद्याआड गेलेली अनेक पानं माझ्या वाचनात आली. आणि त्यातलं एक महत्वपूर्ण पान वाचण्यात आलं ते म्हणजे तैमुरलंग या तुर्क बादशाहचं.
जसजसं वाचत गेले, तसतसं माझं मन कधी क्रोधाने लाल झालं तर कधी दुःखाने हळहळलं. कारण भारतात आलेल्या तैमुरलंगच्या उल्लेखाचं इतिहासातील पान भारतीयांच्या रक्ताने लालबुंद आहे, हिंदू मंदिरांच्या उध्वस्ततेच्या कहाण्यांनी , हिंदू स्त्रियांच्या किंकाळ्यांनी भरलं आहे.
सैफने त्याच्या मुलाचं हे नाव का ठेवलं आणि त्याची त्यामागची मानसिकता काय आहे याचा विचार आपण करूच पण त्या आधी तैमुरलंग बद्दल थोडंसं ….
तैमुरलंग : इतिहासातील रक्तरंजित पान –
इतिहासाच्या पानांमध्ये, असे अनेक शूर योद्धा होते ज्यांची अजूनही अभिमानाने आठवण होते, गौरव होतो, कारण त्यांनी जगासमोर फक्त शौर्याचे उदाहरणच ठेवले नाही तर समाजाच्या हितासाठीही काम केले होते.
पण दुसरीकडे असेही काही योद्धा होते ज्यांना ‘शूर’ तर म्हणतात परंतू त्यांचे नाव ऐकताच मनाचा थरकाप उडतो.
असा जगातील कुख्यात व क्रूर म्हणून प्रसिद्ध असलेला तैमुरलंग १४ व्या शतकात होऊन गेला. तो मूलतः तुर्क होता. धर्माने मुसलमान नव्हता. कारण बगदाद जिंकल्यानंतर त्याने तिथल्या मशिदी अगदी मुस्लीम ग्रंथासह जाळून टाकल्या होत्या.
तो सन १३६९ मध्ये समरकंदचा राजा झाला.(समरकंद भारताच्या वायव्येस होते.) त्याने चंगेजखानाचा आदर्श पुढे ठेवून टर्कीपासून पुढे तजीकीस्थान पर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण भूभागातील २७ राजमुकुट जिंकून घेतले. अलेक्झांडर प्रमाणे जगज्जेता होण्याची त्याची मनीषा होती.
एका आक्रमक लढाईत त्याच्या पायाला जबर दुखापत झाल्याने तो एका पायाने लंगडा झाला आणि त्याला ‘लंग’ हे टोपण नाव पडले. आणि त्यानंतर तो तैमुरलंग नावाने ओळखला जाऊ लागला.
कालांतराने तैमुरने इस्लाम धर्म स्वीकारला. आणि मुळातच असलेल्या विध्वंसक स्वभावात त्याला आता नव्या धर्माचे भूतच संचारले होते.
तशातच त्याने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले. या स्वरीमागे त्याचे प्रयोजन भारतात येऊन सत्ता करणे हे नव्हते.
भारत किंवा हिंदुस्थान त्या काळात अनेक गोष्टींसाठी जगभर प्रसिद्ध होता. भारतात असलेली सुवर्ण संपत्ती, समृद्धी, भव्यता, वैभव दागदागिने व रत्नांनी भरलेली मंदिरे याबद्दल त्याने खूप कथा ऐकल्या होत्या.
राजसत्ता किंवा विजयोन्मादापलीकडे त्याला हिंदुस्थानाबद्दल एक वेगळाच द्वेष निर्माण झाला होता. ही सर्व दौलत लुटून हिंदुस्थान उध्वस्त करायचं आणि तिथली मूर्तीपूजा कायमची संपवायची हा त्याचा मूळ उद्देश होता.
१३९८ मध्ये त्याने बलाढ्य सेनेसह भारतावर आक्रमण केलं.
तैमुरलंग भारतात आक्रमण :
भारतात येताच त्याने दिसेल ते मंदिर तोडा आणि त्या मूर्त्यांना हातोडी कधी लाथेने मारून उध्वस्त करा, मूर्त्यांच्या अंगावरील दागदागिने लुटून तिथल्या लोकांना मारून किंवा गुलाम बनवण्याचा सपाटाच लावला.
त्याला इतिहासात क्रूरकर्मा का म्हणतात? तर त्याचा छंदच अतिशय घाणेरडा.
प्रेतांचे डोंगर रचलेले दिसले की त्याला बरं वाटे. आणि त्यातही शीर धडापासून वेगळं करण्यात त्याला असुरी आनंद वाटे.
तो फक्त दिल्लीला पोचेपर्यंत लाखभर हिंदूंना अश्या प्रकारे प्राणास मुकावे लागले होते.
आणि ज्यांना बंदिवान केले होते त्यात अनेक तरुण व स्त्रिया देखील होत्या. त्यांच्या आक्रोशाने गगन भेदून भेदून जात असे.
दिल्ली पूर्णपणे लुटल्यावर तो भारतात उत्तरेकडे वळला. असंख्य लोकांचा संहार करीत तो जम्मू येथे पोहोचला.
काश्मीरच्या सीमेवर तर त्याने केलेला संहार तर महा-भयावह होता. स्त्री पुरुष लहान मुलांना देखील त्यांने बंदी केलंच परंतू तिथे त्याने तासाला दहा हजार डोकी उडवण्याचा विक्रमच केला…अश्या त्या नराधमाला सर्वच इतिहासकार ‘नरराक्षस’ का म्हणत असावे याचा केवळ अंदाज बांधता येतो.
त्यातही त्याची रक्त्ततृष्णा भागत नसे. त्या धडावेगळ्या झालेल्या शिरांचे देखील मनोरे उभे करायला तो आपल्या सैनिकांना सांगत असे. लिहितांना देखील कष्ट होत आहेत, तर कल्पना करा, त्यावेळी बंदिवान असलेल्या गुलामांना लहान मुलं स्त्रियांना, हे बघतांना किती भयंकर प्रसंगास सामोरे जावे लागले असेल.
चीड यासाठी येते की, त्याच्या आत्मचरित्रात तर त्याने या प्रसंगाचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला आहे:
इस्लाम च्या तलवारीला हिंदू काफिरांच्या रक्ताने मी स्नान घातलं…..
त्यांना तलवारीचं भोजन देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता….
माझ्या सैनिकांना मी आज्ञा केली, सर्वच्या सर्व बंदिवांनाना त्वरित मारुन टाका. माझ्या आज्ञेचे पालन न करणाऱ्यास मी देखील सोडणार नाही. आणि माझी आज्ञा ऐकताच माझ्या सैनिकांनी क्षणात मोहीम सुरु केली आणि एका दिवसांत लाखभर हिंदू पुजाऱ्यांच रक्त सांडलेलं मी पाहिलं.
अश्या प्रकारे, हिंदूंच्या रक्ताचा सडा पाडत असतांना, त्याची मूळ राजधानी समरकंद, येथे त्याच्या विरुद्ध काही कट शिजत आहे अशी बातमी त्यास कळली. आणि रागाने आणि चिंतेने वेडावून त्याने आपले सैन्य व बनवलेले भारतीय गुलाम घेऊन तो समरकंद कडे रवाना झाला.
काही लेखांमध्ये उल्लेख आहे की त्याने या गुलामांकडून समरकंद मध्ये अनेक इमारती व मशिदी बनवून घेतल्या.
तैमुरलंग चा वंश:
बाबर हा तैमूरलंग चा तिसरा नातू.
मग बाबर- > हुमायू -> अकबर -> जहांगीर -> शहाजहान -> औरंगजेब….
म्हणजे…. हा असा सात पिढ्यांचा वंश… ज्यांनी भारतीयांना फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे.
अनेकांनी भारतावर स्वारी केली होती. परंतू या सगळ्या परकीय शक्तींमध्ये क्रूरतेचा शिरोमणी शोभावा असा तैमुरलंग च.
आणि अश्या या नरराक्षस म्हणून इतिहासात कुविख्यात असलेल्या क्रूरकर्माचं नाव आपल्या मुलाला ठेवण्यामागे सैफचा काय उदात्त विचार असावा? इतिहासातील राजाचंच नाव द्यायचं होतं तर इतर कोणताही राजा त्याला सापडला नाही ? की मुस्लीम राजांमध्ये कुणी उदार किंवा लोकप्रिय राजा झालाच नाही?
असेल म्हणा. कारण तसेही, कोणत्याही राजाने पदभार स्वीकारला की मुख्य तुलना रामराज्य किंवा मग शिवशाही बरोबरच होते… या हिंदू राजांनी आपल्या अफाट कामगिरीने मोठी मापदंडच तयार करून ठेवली आहेत. नाही का?
भारतातील जाठ लोकांचा इतिहास काही इतिहासकारांनी लिहिला आहे त्यानुसार, त्या काळात जाठ लोकांची देखील चिकार हत्या तैमूरलंग ने केली होती आणि जाठ लोकांनी देखील त्याला तीव्र प्रतिकार केला होता.
त्यामुळे, सैफ च्या विरोधात, भारतात विशेष करून जाठ लोक का उभे राहिले याचं उत्तर मिळतं. हिंदूंनी मात्र विशेष दखल घेतली नाही याचं सखेद आश्चर्य देखील आता वाटतं.
त्या तैमुरच्या मागे कॅमेरा घेऊन धावणारे पत्रकार बघितले की त्यांची कीव करावीशी वाटते.
बरं, करीना तर मी त्या गावचीच नाही…. काय फरक पडतो असं काही नाव ठेवलं तर, आणि सैफू ने सांगितलं आहे की तैमुर म्हणजे ‘लोखंड’ तर माझा मुलगा मजबूत व ताकदवान असणार …. कळलं का?अशा विचारांची.
आणि सैफ चं म्हणणं काय तर म्हणे मी डिस्क्लेमर द्यायला पाहिजे होते. याचे नाव कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंधीत नाही आहे.
(प्रचंड हशा व टाळ्या )
असो.
जाऊदे बुवा ! आपल्या मुलाचं काय नाव ठेवावं हा त्याच्या पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणून सोडून देऊ. खरंतर नावात काय आहे??
पण गंमत म्हणून एक प्रश्न, की आपल्यात कुणाला मुलगा झाला तर शकुनी , दुर्योधन, रावण किंवा दुःशासन अशी नाव ठेवू का?? किंवा मुलींची कैकेयी, मंथरा अशी काही? का असं करत नाही आपण?
म्हणजे नावात बरंच काही आहे नं??
कारण इतिहासातील ही काही क्रूर व दुष्ट वृत्तीची खलनायक वा खलनायिका असलेली पात्रे …. एकच झाली आणि एकच व्हावीत, ती पुन्हा होऊ नयेत…. अगदी नावाने देखील….. अशी आपली विचारसरणी…
असो.
तर सध्याची गंमत अशी की या तैमुरच्या अब्बाचा…म्हणजे सैफ चा ‘तांडव’ नावाचा सिनेमा, ‘हिंदू देवदेवतांच्या अपमानामुळे ’ सध्या वेगळ्या प्रकारे गाजत आहे. हिंदू देवतांचा अपमान करून हिंदूंच्या भावना दुखवायच्या आणि जातीयवाद घडवून हिंदूंमध्ये बनू पाहत असलेली एकात्मता तोडायची हा उद्देश या सिरीजमध्ये अगदी उघडपणे दिसून येतो. आणि त्यावर बंदीची मागणी अनेक हिंदू संघटना करीत आहेत…..
आज Creative freedom के नाम पर हो रहे अधर्म के ‘तांडव’ को रोकने के लिए अति आवश्यक है, कि सर्वोच्च गुरु का दर्जा प्राप्त चारों पीठों के शंकराचार्य इकट्ठे होकर आगे आएँ, और सभी हिन्दुओं को एक सूत्र में बांधकर उन्हें अपनी आस्था, संस्कृति और अधिकारों की रक्षा के लिए जागरुक करें…
— Arun Govil (@arungovil12) January 18, 2021
बाकी सर्व तुम्ही ओळखताच…..’तांडव’ कडे ढुंकूनही बघू नका. त्यांचं आर्थिक नुकसान केल्याने पुढे याची पुनरावृत्ती होणार नाही.
आवडल्यास जरूर शेअर करा…. आणि हो…..‘नावात काय आहे?’ तुमचं मत नक्की सांगा…
{संदर्भ: सहा सोनेरी पाने-स्वातंत्र्यवीर सावरकर , आपबिती तैमूरलंग (हिंदी)}
Bollywood stars need publicity of their own along with their kids. For that they may keep any names and go into controversy. For this we must ignore all bollywood adds, movies,etc. Movies against any religion should be straightway banned by the board.
Absolutely 👍
The fact of the matter is in our country wrong kind of ppl are idealised and followed and thus whatever stupid they do starts affecting us. For them it’s just a publicity stunt.
The day we stop paying attention towards such actors in Bollywood and for that matter bollywood itself they will be forgotten for good.
We have many great guns and living legends to follow. New platforms have come up other than theatre to acknowledge such people.
आपण आपल्या हिंदु धर्मा चा आदर करायला हवा. असल्या फालतू पिक्चर ला नाव घेण्यासाठी हिंदु देवता ईश्वर याच्या तांडव या नावाचा का आधार घ्यावा? द्या नाव शैतान का आतंक. सर्व हिंदूंनी बहिष्कार च करायला हवा.
बहिष्कारच करत आहेत. अनेक कलावंत देखील एकत्र आले आहेत, आणि अश्या वेब सिरीज ना लगाम देण्यासाठी कायदा हवा अशी मागणी करत आहेत. मुकेश खन्ना यांनी देखील पुढाकार घेतला आहे. कारण सैफ च्या आगामी सिनेमात तो रावणाची भूमिका करीत आहे, आणि रावणाने सीतेचे अपहरण केले ते योग्यच होते असे अकलेचे तारे तोडत आहे. त्यामुळे त्यावरही बंदी घातली जावी अशी सर्वांनी विनंती केली आहे.