Skip to content

Frankly Speaking

By Kimaya Kolhe

Menu
  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
Menu
भारतीय सेना दिवस२०२१

भारतीय सैन्य दिवस

Posted on January 15, 2021 by Kimaya Kolhe

आज १५ जानेवारी ,  भारतीय सैन्य दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस. 

१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. 

याचा अर्थ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही काळ, भारतीय सेना ब्रिटीश कमांडर च्या हाताखाली कार्यरत होती. 

खरंतर, १९४७ च्या वेळी, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याकाळात देशात भयंकर अंदाधुंदी माजली होती. ब्रिटीशांनी फार सहजा सहजी आपल्याला मुक्त केलं नाहीच.

देशाचे लचके तोडूनच आपल्याला आपला खंडित भारत स्वतंत्र करून दिला होता. अर्थात इथल्या मुसलमानांची देखील तशीच मागणी होती. स्वतंत्र पाकिस्तान !!

त्यामुळे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर , सैन्य देखील विभागलं गेलं होतं. आणि त्याकाळात सुरु असलेल्या दंगली व देशातली अशांतता, या कारणांमुळे सैन्याचं मुख्य काम नागरिकांची सुरक्षा व देश विभागणी करतांनाची सुव्यवस्था होतं. 

त्यामुळे काही काळानंतरच म्हणजे १५ जानेवारी १९४९ रोजी, भारतीय सेना पूर्णपणे ब्रिटीश-शून्य झाली असं म्हणायला हरकत नाही.  म्हणूनच हा दिवस ‘भारतीय सैन्य दिवस’ असा ओळखला जाऊ लागला आणि असा हा आजचा दिवस गौरवाने साजरा करण्याचाच. 

सावरकरांवरील एका व्याख्यानात, चारुदत्त आफळे यांनी एक  उल्लेख केला होता, की ब्रिटीश भारतात असतांना जेव्हा बाहेरील देशांत युद्धजन्य परिस्थिती होती, त्यावेळी काही देश ब्रिटीशांविरुद्ध उभे राहिले होते. आणि त्यावेळी, ब्रिटीशांनी भारतीयांकडे मदतीची  मागणी केली होती.

त्यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, ‘तसे केल्यास आम्हांस स्वतंत्र करणार का?’ असा उलट सवाल सरकारला केला होता. परंतू ‘विचार करू ’ हेच उत्तर आले होते.

या संधीचा फायदा घेऊन, सावरकरांनी, ” भारतीय नागरिकांना ब्रिटीश सैन्यात सामील व्हा व ब्रिटिशांकडून त्यांची नवनवीन शस्त्रे, युद्ध काळात लागणारी आधुनिक उपकरणे व त्यांचा वापर शिकून घ्या, त्याचा फायदा आपण पुढे ब्रिटीशांशीच लढण्यास करू” असे आवाहन केले होते .

त्यांची ही चलाखी व अत्यंत दूरदर्शी विचारसरणी अनेकांना पटली होती पण काहींनी मात्र त्यांच्यावर विचित्र आरोप केले. असो, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. 

पण या आवाहनामुळे अनेक भारतीय लोक, सैन्यात दाखल झाले. ती आर्मी ब्रिटीश+भारतीय अश्या मिश्र रुपाची होती. 

१५ जानेवारी १९४९ नंतर मात्र , उरले सुरले सर्व ब्रिटीश आल्या मार्गी निघून गेले. त्यामुळे, भारतात ‘भारतीय सैन्य दिवस’ मोठ्या दिमाखात साजरा करतात. सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दिल्ली व सेनेच्या सर्व मुख्यालयात हे कार्यक्रम पार पडतात.

Army Day 2021 https://t.co/GxqzOkh1KD

— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) January 15, 2021


खरं पाहता, आपण सर्वच जण, भारतीय सैन्यातील एक न् एक सैनिकाचे सदैव ऋणी आहोत. त्यांचं शौर्य पराक्रम, साहस यांच्या कथा किंबहुना चित्तथरारक कथा ऐकल्या की आपण किती भाग्यवंत आहोत याची जाणीव होते. कारण देशाच्या सर्व सीमांवर भारतीय सैन्याचा अथक पहारा, चिरंतन  सुरूच आहे. 

मेजर जी डी बक्षी यांच्या मुलाखतीत त्यांनी एक प्रसंग सांगितला होता. तो असा की, ते आणि त्याचा थोरला भाऊ, दोघेही भारतीय सैन्यात होते. आणि एकदा शत्रूशी झालेल्या चकमकीत, काही सैनिकांसोबत  त्यांचा भाऊ देखील शहीद झाला. 

मेजर बक्षी देखील तेव्हा ड्युटीवर होते परंतू ते सहीसलामत वाचले. पण शहीद सैनिकांच्या देहाच्या मात्र अक्षरशः  चिंध्या झाल्या होत्या. भावनांना अतिशय लगाम देत, त्यांनी भावाच्या देहाचे दूरवर उडालेले, मिळतील तेवढे, ओळख पटतील तसे तुकडे जमा केले व अंत्यविधी पार पाडला . 

त्यांची ती मुलाखत ऐकल्यानंतर कितीतरी दिवस माझं मन सुन्न होतं.

कधीही न बघितलेल्या व्यक्तीबद्दल केवळ कृतज्ञेपोटी आपलं मन असं भरून येतं तर या शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांचे काय होत असेल याची कल्पनाच करवत नाही.

परंतू, ही माणसंच मुळी वेगळी. त्यांना स्वतःच्या जिवापेक्षा देशच प्रथम दिसतो. अगदी युद्धजन्य परिस्थिती नसतानाही हिमालयातील गोठविणाऱ्या थंडीत, थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्येकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात.

भारतीय सेना

भारतीयांच्या रक्तातच शौर्य आहे ह्याचे इतिहासात देखील अनेक दाखले आहेत. आपल्या देशावर पहिलं  परकीय आक्रमण करणारा अलेक्झांडर देखील भारतीयांच्या पराक्रमापुढे काही करू शकला नाही व जग जिंकायचे स्वप्न अपुरे ठेवून भारतातून माघारी फिरला हे आपल्याला परिचित आहेच.

त्यामुळे जगासाठी तो ‘अलेक्झांडर -द-ग्रेट’ असला तरी भारतात त्याची ओळख ‘अलेक्झांडर-द-नॉट-सो-ग्रेट’ अशीच व्हायला हवी हे मागच्या लेखात आपण पहिलेच आहे.

म्हणूनच भारतीय सेनेचा गौरव करावा तितका कमीच. २०१९ च्या सर्वे नुसार भारतीय सेना/ भूदल हे तर जगातील तिसरे सर्वाधिक मोठे लष्कर आहे हे सिद्ध झाले आहे. 

आताही चीन मार्फत भारतीय सीमांवर काहीना काही घुसखोरी सुरु आहेच. त्यामुळे पुन्हा आपल्या देशाला कुणाचा दास बनू देणार नाही हे प्रत्येक सैनिक प्रत्येक श्वासासोबत म्हणत असेल यात अजिबात शंका नाही. 

आपण करोडो लोक, जर आज अगदी आनंदाने स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, तर ते फक्त काही लक्ष सैनिकांमुळेच. त्यामुळे देव्हाऱ्यातील देवासोबत एकदा यांचे ही नित्यस्मरण करावयास हवे. 

अनेक कविवर्यांनी देखील या भावनेने ओतप्रोत भरलेल्या अनेक कविता लिहिल्या आहेत. आणि त्यापैकी,  ग. दि. मांच्या एका कवितेतील ओळी, आजच्या दिवशी नक्कीच आठवतात,

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी

सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी |

 

वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो

राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो |

परि आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी

सैनिक हो तुमच्यासाठी |

 

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती

तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती |

एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी

सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी |

१५ जानेवारी, भारतीय सैन्य दिवस…. सर्व जवानांना सलाम व  भारतीयांना शुभेच्छा !! 

Sharing is caring 🙂

  • WhatsApp
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Reddit
  • Pinterest

Related

7 thoughts on “भारतीय सैन्य दिवस”

  1. Janhavi Kaustubh says:
    January 16, 2021 at 12:45 PM

    खरच अभिमान आहे आपल्या सैनिकांचा
    …you had presented very nicely

    Reply
  2. Unknown says:
    January 15, 2021 at 8:02 PM

    I just love to read, u nicely done.

    Reply
    1. Kimaya Kolhe says:
      January 15, 2021 at 9:08 PM

      Thanks🙂

      Reply
  3. Kalyani says:
    January 15, 2021 at 6:46 PM

    Salute to Indian army! Jai Hind 🇮🇳

    Reply
    1. Kimaya Kolhe says:
      January 15, 2021 at 9:08 PM

      Jai Bharat 🙏

      Reply
  4. Manjiri Shingre says:
    January 15, 2021 at 6:43 PM

    Jai Hind ..
    Very well written.

    Reply
    1. Kimaya Kolhe says:
      January 15, 2021 at 9:07 PM

      Thanks 😊

      Reply

I would appreaciate hearing your thoughts on this.Cancel reply

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 64 other subscribers

You may also like :

  • सात एकावन्न डोंबिवली भाग ४
  • सात एकावन्न डोंबिवली- भाग ३
  • सात एकावन्न डोंबिवली भाग २
  • सात एकावन्न डोंबिवली -भाग १
  • गीता जीपीटी
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
© 2025 Frankly Speaking | Powered by Superbs Personal Blog theme