आतापर्यंत आपण अलेक्झांडर नावाच्या बादशाह बद्दल ‘द ग्रेट’ हे विशेषण लावायला शिकलो. कारण तसं इतिहासातून आपल्याला शिकवलं गेलं. परंतू एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाने आता हे पुसून टाकायला हवं. ते कसं? त्यासाठी आजची ही पोस्ट :
आपल्या भारतभूमीवर ब्रिटिशांच्या आधी देखील अनेक परकीय आक्रमणे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी परकीय शत्रूच्या टाचेखाली पिचून गेले असतांना तत्कालीन राजांनी आणि अनेक धुरंधरांनी , शूर वीरांनी प्रबळ युद्ध करून झुंझार लढा देऊन स्वराष्ट्रास पारतंत्र्यातून मुक्त केले आहे.
हे खरं, की भारतावर झालेली सगळ्यात पहिली पराराष्ट्राची स्वारी म्हणजे अलेक्झांडरचीच. अलेक्झांडर लाच ‘शिकंदर’ वा सिंकदर’ म्हणून देखील ओळखले जाते.
‘अभिनव भारत’ ह्या क्रांतिकारक संस्थेचे प्रमुख सदस्य असलेले डॉ. जयस्वाल यांनी लिहिलेल्या ‘Hindu Polity ‘ या सुप्रसिद्ध ग्रंथात सिंधू नदीच्या उभय किनाऱ्यांवर तिच्या समुद्र संगमापर्यंत पसरलेल्या भारतीय गणराज्याच्या वेगवेगळ्या लोकसत्ताक राज्य घटनांचे संशोधनपूर्वक वर्णन केले आहे.
म्हणजे दोन अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलीकडे अगदी इराणच्या सीमेला भिडलेल्या प्रदेशांपर्यंत भारतीयांची वस्ती आणि राज्ये पसरलेली होती.
आपला भारत देश हा नैसर्गिकरीत्या देखील एवढा भाग्यवंत आहे की अगदी सुरवातीपासूनच अनेक परकीय देशांना आपल्या देशावर साम्राज्य करण्याची इच्छा होती. आणि तसे प्रयत्न देखील झाले.
अलेक्झांडरने भारतावर आक्रमण करण्या आधी ग्रीक लोकांना एकत्र करून एक मोठं सैन्य उभं केलं आणि ग्रीकांचा महान शत्रू असलेल्या पारसिक साम्राज्याचा सम्राट दरायस वर चालून गेला. ग्रीक सैन्य एवढं बलाढ्य होतं की त्यांच्या संघटीत सैन्यापुढे पारसिक राजसत्ता अक्षरशः उखडून पडली.
आणि अलेक्झांडरने पारसिक ची राजधानी देखील जिंकून स्वतःला ‘पारसिक सम्राट’ घोषित केलं.
आता, ग्रीस आणि पारसिक यांच्या सुविशाल राज्यांच्या सम्राटपदी बसल्याने अलेक्झांडरची राज्य जिंकायची भूक फार वाढली.
‘आपण मनांत आणू तर साऱ्या जगास जिंकू, आणि इतिहासात आपले नाव जगज्जेता म्हणून गाजेल’ अशा प्रबळ आत्मविश्वासाचा उन्माद त्याला चढला होता .
आणि मग पिढ्यानपिढ्या ज्याची कीर्ती ऐकत आलेले भरतखंड (आजचा भारत ) देखील आपण सहज जिंकू अशा दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडरने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले.
त्या साठी ग्रीकांचे निवडक, ताज्या दमाचे, विविध शस्त्रांनी सज्ज , एक लाख पायदळ आणि पंधरा हजार घोडेस्वार असे नवे सैन्य उभारले.
बरं, अलेक्झांडरने यापूर्वी विजयामागून विजय मिळवले असल्याने, ग्रीक सैन्याची, आपल्या या महासेनानी व सम्राटावर एवढी श्रद्धा बसलेली की तो कुणी दैवी पुरुष आहे की काय अशी त्यांची भावना झालेली.
आणि गंमत अशी की अलेक्झांडर देखील स्वतःला दैवी पुरुषच समजू लागला होता.
तक्षशीला :
अलेक्झांडर त्याचं तुंबळ ग्रीक सैन्य घेऊन भारतात आला तो सर्वात पहिले तक्षशिलेला येऊन पोचला. परंतू दुर्दैव असं, की त्यावेळच्या राजा अंबुज ने एवढे मोठे सैन्य पाहून युद्ध न करताच शरणागती पत्करली.
परंतू त्याच्या या कृत्याची इतर राज्यात छी-थू होऊ लागली. हे क्षत्रिय धर्माला कलंक आहे अशी त्यांची धारणा होती. आणि त्यामुळेच, त्या बलाढ्य ग्रीक सैन्यांशी प्रखर सामना द्यायचा निर्धार आजूबाजूच्या भारतीय गणराज्यानी केला.
अलेक्झांडरने मात्र तक्षशीला जिंकल्याने इतर राज्यांना शरण येण्याची आज्ञा सोडली परंतू कोणीच ती स्वीकारली नाही आणि उलट युद्धाचे आव्हानच दिले.
पुढे तो भारताच्या उत्तरेकडेच असलेल्या पौरव राजावर चालून गेला. पौरव राजाचं मुख्य सैन्य हे लढाऊ रथ व हत्तीचं होतं. दोहोंमध्ये तुंबळ युद्ध झालं. ग्रीकांचे देखील अनेक सैनिक मारले गेले. परंतू अंततः जीवावर उदार होऊन लढत असलेला, हत्तीवर स्वार झालेला पौरव राजा घायाळ झाला आणि अलेक्झांडरला पुन्हा एकदा विजय मिळाला.
परंतु या युद्धात ग्रीकांच बरंचसं सैन्य अधू, घायाळ आणि खरोखर निकामी झालेलं.
या विजयामुळे आजबाजूच्या गणराज्यांचे धैर्य खचून जाईल असं अलेक्झांडरला वाटलं होतं परंतू तो त्याचा भ्रम होता.
तो जसजसा भारतात पुढे जाऊ लागला, तसतशी त्याच्या वाटेतील प्रत्येक लहान मोठी गणराज्ये त्याला लढा देत राहिली. अश्या या सतत च्या लढ्यामुळे ग्रीक सैन्यावर सतत लढण्याचा ताण येऊ लागला.
अलेक्झांडरची भूक काही मिटली नव्हती.
एक एक गणराज्य जिंकत तो पुढे जात असतांना त्याचे सैन्य व्यास नदीपर्यंत पोचले.
परंतू, तिथली आणि पुढे गंगे काठची मोठमोठी राज्ये अलेक्झांडरच्या सैन्याशी लढण्यास सज्ज झाली आहेत ही वार्ता त्यांच्या कानावर पोचली आणि आधीच थकलेल्या ग्रीक सैन्याची व्यास नदी ओलांडून जायची सुद्धा इच्छा होईना.
आपल्या सैन्याला उत्तेजन देण्यासाठी अलेक्झांडरने त्यांना भाषण दिले, “ग्रीस चे सैन्य अजिंक्य आहे ही तुमची जगभर असलेली कीर्ती. आता पर्यंत ज्या लढाया तूम्ही लढले आणि जय मिळवले ते लहान सहान शत्रू होते. आता भारतात शिरल्यावर मोठमोठ्या शत्रूंना तोंड द्यायचे आहे. या व्यास नदीच्या पलिकडे असलेली गणराज्ये शरण न येता आपल्या विरुद्ध रणांगणात उतरली आहेत. त्यांची खोड मोडून पुढे गंगेच्या काठच्या अत्यंत सुपीक राज्यांना जिंकून साऱ्या जगात आपलं नाव गाजवलं पाहिजे.”
पण अशा भाषणाने सैन्याला चेव येण्याऐवजी ते अजूनच घाबरले. आज लढलो त्याहीपेक्षा भीषण संग्राम भारतीय सैन्याशी करावा लागणार या विचारानेच त्यांना धडकी भरली.
डॉ.जयस्वाल यांनी आपल्या ‘Hindu Polity’ या ग्रंथात याबाबत जे लिहिलं आहे, त्याचा इथे जरूर उल्लेख करावासा वाटतो, ते लिहितात , “The Greek army refused to move an inch forward to face the Bhartiya nations whose very name, according to Alexander struck his soldiers with terror”
(फक्त भारतीय नाही तर अनेक ग्रीक साहित्यात देखील याचा उल्लेख दिला आहे.)
व्यास नदी उतरायला सुद्धा सैन्य तयार नाही हे पाहून अलेक्झांडर संतापला. परंतू, सैन्यावर संतापून त्यांचे उरले सुरले मनोधैर्य खचण्या पेक्षा त्याने माघारी जायचे ठरवले.
त्याने तसं सांगताच सैन्यात आनंद पसरला.
ऐतिहासिक सत्य हेच आहे की, भारतीयांच्या पराक्रमाने त्याची रग जिरवली होती आणि म्हणून अलेक्झांडरला मागे फिरणे भाग पडले, ते स्वच्छेने नव्हे तर भारतीयांपुढे ग्रीकांची पीछेहाट झाली होती.
त्यांमुळे खाली दक्षिण भारताकडे तर सोडा पण साधी व्यास नदी देखील तो उतरला नाही. उपमा द्यायचीच झाली तर आपण म्हणू की, फार फारतर भारताच्या अंगणात येऊनच त्याला पुन्हा परत जावे लागले.
भारतावर इराण प्रमाणे अगदी सहज विजय मिळवता येईल आणि आपण भारत सम्राट बनू वगैरे स्वप्न हे त्याचे कधीच पूर्ण होऊ शकले नाही.
युरोप मध्ये ग्रीक संस्कृतीच पुढारलेली असल्याने त्यांच्या साठी अलेक्झांडर हा सम्राट म्हणून सर्वश्रेष्ठ होताच आणि त्याचा उल्लेख ‘अलेक्झांडर द ग्रेट’ असा केला जाई. तो त्यांच्या पुरता ठीक पण भारतीयांनी त्याला ‘ग्रेट’ म्हणणे म्हणजे त्या काळातील झुंज देणाऱ्या आणि क्षत्रिय धर्म निगुतीने पाळणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याचा व तेथील राजांचा अपमानच नाही का?
परंतू भारतात तत्कालीन चाणक्य व त्यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य हा अलेक्झांडर व ग्रीकांच्या तोडीस तोड प्रतिद्वंद्वी होता हे युरोपातील काही इतिहास तज्ञांनाच माहीत होतं.
ब्रिटीशांचे भारतावर राज्य असतांना त्यांनी सुरु केलेल्या शाळांतून ‘अलेक्झांडर द ग्रेट’ नावाचे रोमहर्षक अध्याय अनेक पिढ्यांकडून गिरवून घेतले गेले . परंतू त्याच काळातील भारतातील सम्राट चंद्रगुप्त काय किंवा चाणक्य कोणत्या झाडाचा पाला हे देखील मुलांना माहीत नव्हते कारण तसे जाणीवपूर्वक शिकवले गेले नाही.
युरोपियन जनतेत तर अशी कथा प्रचलित आहे की, “अलेक्झांडर हा जगज्जेता होता. त्याने सारा भारत जिंकला. आणि सारे जग जिंकून तो मायदेशी परत आला तेव्हा साऱ्या जगात आता जिंकायला असा एकही देश उरला नाही, या निरुत्साही जाणीवेने त्या सम्राटाला रडू कोसळले.”
वाह रे !
मुळात तो जगज्जेता नव्हताच आणि भारत विजेता तर तो नव्हताच नव्हता. आता तो खरोखरच रडला असेल असं धरलं तर तो या जाणीवेने असेल की, ज्या भारताचा मी सम्राट होऊ इच्छित होतो, त्याचा फक्त लहानसा तुकडा मला जिंकता आला. आणि जो भाग जिंकला तो ही ते बंडखोर भारतीय माझ्या हातून हिसकावून घेतील की काय या भावनेने.
नाही का??
बरं एक गोष्ट नमूद करायची राहिली ती अशी की, अलेक्झांडर माघारी वळून गेला तेव्हा, त्याने थोडीफार जिंकलेली जी गणराज्ये होती त्यांनी तत्काळ त्या ग्रीकांचे ध्वज, राज चिन्हे यांचा नायनाट करून टाकला जो भारतीय भाग अलेक्झांडरने ‘जिंकलेला म्हणून ग्रीक राज्यात समावून घेतलेला तो लगेच स्वतंत्र करण्यात आला. हे सर्व भारतीय राजकारणाचं एक षड्यंत्र होतं, ज्यात ग्रीकांचे अवशेष सुद्धा उरू दिले नाहीत, असे की, जणू भारतावर कुणा अलेक्झांडर वा ग्रीकांची स्वारी झालीच नव्हती.
या षड्यंत्रातील प्रमुख काही नेत्यांमध्ये दोन धुरंधर नेते होते ते म्हणजे सम्राट चंद्रगुप्त आणि चाणक्य.
असो. मुख्य हेतू हाच की, आपल्याला आपल्या इतिहासाचा अतिशय गर्व वाटावा अशा अनेक गोष्टी देशात घडल्या आहेत. आणि थोडं मागे जाऊन इतिहास वाचला तर इतकी वर्ष असलेले गैरसमज दूर ही होतात. आणि भारतीय असल्याचा नितांत अभिमान वाटू लागतो.
‘अलेक्झांडर द ग्रेट’ हेच नाव अजूनही भारतात देखील प्रचलित आहे याची खरोखर खंत वाटते. आता निदान आपल्या शाळा महा विद्यालयांतून त्यापुढचं ग्रेट हे विशेषण काढून टाकण्यात यावं असं वाटतं. कारण अलेक्झांडर (नॉट सो ) ग्रेट भारत काय पण त्याचा एक चतुर्थ अंश देखील जिंकू शकला नाही एवढं शौर्य आपल्या रक्तात होतं.
या संबंधी अजून भरभरून माहिती गुगल वर उपलब्ध आहेच. मी फक्त एक छोटासा आढावा घेतला. दीर्घ तपशील आणि अलेक्झांडर बद्दल अजून काही रंजक इतिहासातील गोष्टी माहीत असल्यास त्या नक्की नमूद करा.
जय हिंद !
धन्यवाद.
Nice hestoric information given.
Thanks 🙂
Nicely written article Kimaya. Even I heard that while he was in India, he became sick and didn’t get chance to get back to Greece. He died while going back…even his army had battle with Maurya dynasty – Chandragupta’s army.
Thanks Mandar. And thanks for this update regarding Chandragupta.
Nicely written article Kimaya. Even I heard that while he was in India, he became sick and didn’t get chance to get back to Greece. He died while going back…even his army had battle with Maurya dynasty – Chandragupta’s army.
Good info 👍🏻
thanks 🙂
Great Kimaya. Thanks for sharing this info. I was not aware about this fact.
Thnku 😊
Superb Kimu 👌👌.. .Thanks for enlightenment on this Myth of Alexander
Thanks 🙂
👍