मागील आठवड्यात ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक घरपोच आलं. त्यावेळी कुरियर आणणारे काका काहीसे वयस्कर होते. भर दुपारी आल्याने घाम पुसत पुसत त्यांनी पाणी मागितलं. आणि दिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘असं विचारणं योग्य नाही, पण आत नक्की काय आहे?’ म्हटलं, ‘पुस्तक आहे’ त्यावर ते म्हणाले ‘चिकार खच येऊन पडलाय, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे.’ मग…