टू कुक ऑर नॉट टू कुक ….दॅट इज द क्वेश्चन….. खावं की खाऊ घालावं हाच एक सवाल आहे…. ह्या किचनच्या ओट्यावर तळण्याचा भाजण्याचा लाटण्याचा मळण्याचा भाग होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?? की फेकून द्यावं भांड्यांचं हे लख्तर त्यात अडकलेल्या जुन्या पाककृतीच्या आठवणींसकट भांड्यांच्या दुकानाच्या काळ्याशार डोहामध्ये ??? आणि करून टाकावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?? पोळपाटाचा…..लाटण्याचा……..