संध्याकाळी पावणे सहा वाजले तशी मृणाल प्रीती जवळ आली आणि म्हणाली,”प्रीती लक्षात आहे न? आज आपल्याला शॉपिंगला जायचय. आज शार्प सहाला ऑफिस सोडूया प्लीज.”
“हो आहे लक्षात…. एवढं संपवते …. ईओडी मेल कर असं सांगून गेलेयत सर…सो फक्त दोन मिंट दे मला. तू रेडी रहा. मी आलेच.”
“ठीके.” म्हणत मृणाल निघून गेली.
मृणालचं लग्न पुढच्या महिन्यात असल्याने आज दोघी शॉपिंग करणार होत्या. एकूणच मस्तीचा मूड. त्यामुळे ‘आज घरी लेट होईल येतांना, मृणालची शॉपिंग करायची आहे……आणि जेवूनच येईन’ हे प्रीतीने सकाळीच घरी सांगून ठेवलं होतं…
“दहा पेक्षा जास्त वाजवू नकोस बाई….” असं आईने सांगितलेलं त्यामुळे फार्फार तर सव्वा नऊ पर्यंत मी तुझ्या सोबत असेन.. साडे नौ च्या आसपास मी ट्रेन पकडेन असं तिने मृणालला सांगितलं.
साधारण साडे आठला विनोद आणि कौस्तुभ डोंबिवलीला उतरले.
उद्या सात एकावन्नला भेटायचं ठरवून कौतुभ मानपाडा रोडला गेला त्याच्या बाईकसाठी आणि विनोद राजाजी रोडला पे and पार्कला.
बाईक काढली… आणि घरी जायला निघायच्या आधी जाता जाता सकाळी ती मुलगी भेटली तिथे जस्ट जाऊन बघूया…म्हणून निघाला.
तिथे पोचल्यावर पाहिलं तर तिची स्कुटी तिथेच उभी दिसली. त्याच्या मनात विचार आला, अजून स्कुटी इथेच आहे म्हणजे ती अजून ऑफिस मधून आलेली दिसत नाहीये….
थोडं थांबलं तर कदाचित भेट होऊ शकते….
पण….नको… उगाच आगाऊपणा वाटेल तीला. असा विचार करून तो घरी गेला..
इकडे सवा दहाला प्रीती डोंबिवलीला पोचली. स्कुटी काढतांना…. आज मी फारच रूड वागले त्याच्याशी…..उद्या जरा लवकर निघून त्याला गाठायचं आणि thanks बोलायचं असं तिने ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी भराभर आवरून…आठवणीने डबा घेऊन विनोद स्टेशनला पोचला. इंडिकेटर वर पाहिलं तर 7 : 51 ….घड्याळात पाहिलं तर 7:35 …wow!!…. अजून बराच वेळ आहे.
कौस्तुभही आला नव्हता आणि प्रिया सुद्धा!!!.
मग मी का लवकर आलोय????
खरंच तिला भेटायला मी एवढ्या लवकर आलोय का???? असं त्याला वाटत होतं
इतक्यात मागून “ हाय……” अशी कुणी तरी हाक मारली.
एक क्षण त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला….
कारण बाजूला स्वतः प्रीती उभी होती.
तीच स्वतःहून त्याला भेटायला आलेली……
“ओ……हाय!!!😊…… प्रिया…राईट??”
“नाही नाही…प्रीती….”
“हा हा….. राईट…..प्रितीच बोल्लेलीस तू….. राईट….. सो??????”
“सो????? काही नाही…. सहजच …….अम्म्म्म……. Actually तुला सॉरी बोलायचं होतं…”
“सॉरी???? 😳….का???? ”
“अरे……. कालचं माझं बिहेवियर….मलाच नंतर खूप वाईट वाटत होतं…..की मी अशी डायरेक्ट तुझी पार्किंग घेतली आणि वर तुझाशीच भांडले😞….. युनो….”
“अर्रे……. नॉट अ बिग इशू……ते मी तुला बोललोय नं….. उधारी…… कधीतरी तुझ्या जागेवर मी माझी बाईक लावेन..…..😂😂हाहा…जस्ट किडिंग….”
“नाही नाही…..यु आर करेक्ट…… बाय द वे काल लावलीस कुठे मग तुझी बाईक???”
“तू सजेस्ट केलस तिथेच……राजाजी रोड….पे and पार्क”
“ओह….रियली सॉरी …😞.मला तिथे पार्क करायला अजिबात आवडत नाही..ते लोक चावी ठेऊन घेतात आणि कुठे पण ठेवलेली असते रात्री….”
“हो पण माझाकडे काल काहीच इलाज नव्हता.”
तेवढ्यात विनोदचा फोन वाजला.
कुस्त्या कॉलिंग….
“हा बोल भाई…”विनोद.
“में ब्रीजपे हे…..तू पोहचा क्या स्टेशन?????”
“हा आजा…आपल्या नेहमीच्या जागी आहे.”
“ती मुलगी दिसतेय का लेडीज डब्याजवळ???”
“हो हो…प्रोजेक्ट आहे माझ्या पीडी मध्ये…..…..”
“अर्रे प्रोजेक्ट नई बे….…..वो प्रिया…प्रिया….दिखी क्या तेरेको????”
“हे हे……… प्रोजेक्ट मेरे साथ लिया हे मेने😳……”विनोद….
“तू कुंवारा मरेगा साले…😣…”कौस्तुभ वैतागला.
फोन कट करून विनोद प्रीतीला म्हणाला…. “माझा कलीग कम जिग्गी दोस्त येतोय..कौस्तुभ..…. थोडा येडा आहे….पण चांगलाय….. तो काही विअर्ड बोलला तर प्लीज …. डोंट माइंड. 😊 ”
“ओके…पण मी आता जाते लेडीजला … ट्रेन येईल आता….”
“नाही नाही….. प्लीज आज भेटच त्याला…नाहीतर तो मारून टाकेल मला….”
“पण त्याला कुठे माहितीये माझ्याबद्दल????“ प्रीती..
तेवढ्यात कौस्तुभ आला त्याने लांबूनच विनोद आणि प्रीतीला पाहिलं होतं…
मागून त्याने विनोदच्या पाठीवर जोरात फटका दिला.
“हाय विनोद…हाय प्रिया…मायसेल्फ…कौस्तुभ.” कौस्तुभ म्हणाला…
“अरे माझं नाव प्रीतीये….. ”
“ओह सो सॉरी…. हा मला काल प्रिया म्हणालेला….…..”
“.😳😳😳😳😳……………..” विनोदची चांगलीच टरकली…”कधी??????”
“अरे तूच म्हणालास न काल….. डोंबिवलीच्या पोरींना काही शिस्त नाहीये आणि कोणीतरी प्रिया म्हणून भेटली तिने सकाळी सकाळी पार्किंग वरून तुझा भेजा फ्राय केला असं????? बॉस….तुही बोला ये सब….. ”
😱😱
हे ऐकून प्रीती आणि विनोद दोघेही घाबरून एकमेकांकडे बघायला लागले.
“😳पण मी सॉरी बोलले होते ह्याला… in fact आजही मी सॉरी आणि thanks बोलायलाच आलेय.”
विनोद लगेच म्हणाला…..“येस येस…. तू करेक्ट आएस……… प्रीती… मी असं काहीच बोललो नाहीये….. हा कुस्त्या….मी तुला आधीच बोल्लेलो…..जस्ट इग्नोर…..”…
“मला काहीच कळत नाहीये😞😞….. एनी वेज….. एम लिव्हिंग….सात एकावन्न येतेय.”
“बाय प्रीती…. आम्हालाही हीच ट्रेन पकडायचीय….तुझा नंबर देतेस का..???” कौस्तुभ म्हणाला….
“अम्म्म….लेट होईल आता…….उद्या भेटू ….उद्या देते नंबर… ”प्रीती म्हणाली.
“फाईन….बाय …नाईस टू मिट यु प्रीती..”: कौस्तुभ …
“सेम हियर…..बाय…..बाय विनोद.. ” असं म्हणून प्रीती लेडीज्ला गेली.
विनोद फक्त “बाय” इतकच बोलला.
ती गर्दीत दिसेनाशी झाली आणि कौस्तुभ जोरजोरात हसायला लागला….
विनोदचा मूडच गेलेला….”समज में नही आरहा तू दोस्त हे की दुश्मन..😒.”
कौस्तुभला हसू आवरत नव्हतं…..
“😄😄चल पेहले ट्रेन पकडते हे फिर डिस्कस करते हे….बाकी तर आता सात एकावन्न वर सोपवून देऊ😄😄.”
क्रमशः 😊
#सातएकावन्न डोंबिवली