गॅलरीतुन आईने जोरात हाक मारली.
“विनोद, अरे डबा विसरलास”
विनोदच्या कानावर पडलं पण आज सॉलिड लेट झालेला,
त्यात बाईक लावायला हवी तशी जागा मिळत नाही, रोज पार्किंगची मारामारी असते मानपाडावर सकाळी सकाळी…
त्याने ऐकलं न ऐकल्यासारखं करून फक्त
“राहू दे आता …खाईन कॅन्टीनमध्ये काहीतरी……मी निघतो ग प्लिज आता ….बाय” ओरडला
वरून आई: “ थांब नाहीतर मी येते खाली…”
“नको यार आई….प्लिssssज….खूप लेट झालाय आज काही करून डोंबिवली लोकल पकडायचीयेे मला… लॅपटॉप आहे सोबत”
“नुसता बेपर्वा झालायस .”
“बाय” असं बोलून आईचं पुढचं काहीही न ऐकता त्याने लगेच बाईक सुरु केली.
मानपाडा रोडवर पोचला….
स्मार्ट वॉच वर टच करून डेट चेक केली…
“शीट!!!!! 😫आज पी वन आहे….”
यु टर्न मारून पूर्ण रोड फिरला…पण सर्व पार्किंग फूल झालेलं..
आता शिव मंदिर रोडला लावावी लागणार ….
शिव मंदिर रोड पार्किंग पण पॅक झालेलं….
एक चक्कर पुन्हा मारताना त्याला एक बाईक वाकडी लावलेली दिसली…
“साsssला…..नीट लावायला होतं काय याला” 😡
म्हणत त्याने तिथेच बाजूला बाईक लावली, उतरला, वाकडी बाईक सरळ केली, लावता लावता “ मेन स्टँडला पण आम्हीच लावायची” चरफड सुरूच होती..
पण ठिके यार….थोडी जागा तर मिळाली करत तो तिथून बाहेर आला आणि त्याची बाईक स्टार्ट करायच्या आत मागून जोर जोरात हॉर्न वाजवत एक स्कुटी आली आणि रिकाम्या पार्किंग मध्ये धाडकन पार्क करून एक मुलगी उतरली….
विनोदला दोन क्षण काही कळलंच नाही…
आणि कळल्यावर तो जोरात ओरडला…
“ए हॅलो, मी लावतोय गाडी इथे”…😡
“एक्सक्यूजमी…..हे तुझ्या नावावर ऍलोटेड आहे का??ईट्स कॉमन पार्कींग….पी वन ओके??…मी आधी आलीय इथे”
“व्हॉट द….”
“ए हॅलो…..माईंड युअर……”
“फालतूगिरी…..”😒
“म्हणजे????”
“हे बघ सकाळी सकाळी डोक्यात जाऊ नकोस, मी इथे येऊन ही भेंडी बाईक आधी सरळ करून मेन स्टँडला लावून एवढी मेहनत केलीय….. माझी बाईक लावणार मी इथे द्याट्स इट….”
“प्लिज ….बरं सॉरी ….एक रिक्वेस्ट …….आता पुरतं आज तू मानपाडाला लाव ना”
“मानपाडा कधीच फुल्ल झालंय”
“ओके……अंममम… मला आज खरंच खूप घाई आहे रे….डोंबिवली लोकल पकडायची आहे, नंतरच्या ट्रेन मध्ये चढताच येत नाही मला….रियली सॉरी…नाहीतर…..नाहीतर एक काम कर ना , राजाजी रोडला रेल्वेचं पे अँड पार्क आहे….तिथे…. ”
“अरेर्रे व्हॉट??????😵 तू जा पहिले पे अँड पार्कला.. मी का जाऊ?????कोण तू????मला का जायला सांगतेयस????आपण ओळखत सुद्धा नाही…..”
“आय नो आय नो….पण आजच्या दिवस ….प्लिज यार ….आज नेमका लॅपटॉप आहे सोबत नाहीतर मी गेले असते नेक्स्ट कोणत्याही ट्रेन ने”
“माझाही लॅपटॉप…… **********😡” वैतागून दात ओठ खात विनोदने तिचं पुढचं लेक्चर सुरू होण्यापूर्वी बाईक काढली.
इकडे तीही पळत पळत स्टेशनला निघाली.
“प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची गाडी ……”
अन्नोउनसमेंट ऐकत ऐकत तिने ब्रिज गाठला.
“शीट!….ही नको जायला” म्हणत धक्के खात खात ती सुसाट पळत सुटली…..आजूबाजूने पण काही जण पळत होतेच कुणी फास्ट साठी कुणी डोंबिवली ट्रेन साठी.
जिना उतरताना मात्र पहिल्या डब्यातून
“गणपती बाप्पा…..मोsssss रया” आवाज आला आणि तिचीही गाडी चुकलीच.
विनोद सुद्धा पे अँड पार्क मध्ये गाडी लावून आला.
प्लँटफॉर्म वर पोचला आणि समोर तिला उभी बघून “ह्या हेकेखोर मुलींना असंच पाहिजे 😛” असं मनात म्हणत तिच्या बाजूला येऊन म्हणाला
“अरेच्या !! आज लेट झाली की काय सात एकावन्न??😛”
तिने रागाने पाहिलं त्याच्याकडे.
“तू शिव्या घातल्याच असशील नाही का??”
“नाही गं….तो बसलाय ना वर…..तो बघत असतो सगळं”
“नॉनसेन्स”
“मी???? अरे यार मला वाटलं एवढी पळत गेलीस तर मिळाली असेल तुला…..डोंबिवली लोकल….जाऊदे पुढची येईलच…पण बघ…म्हणून सांगतो सकाळी सकाळी कुणाचं पार्किंग हिरावुन घेऊ नये गं…त्रास होतो जाम.”
“मी सॉरी म्हटलं होतं फॉर युअर के आय”
“ओह!! ओह!! थँक्स बाय द वे”
“फॉर व्हॉट??”
“तुला नाही गं, देवाला…. तो आहे कुठेतरी असं आई म्हणायची सारखी….पण आज कळलं….”
“काय कळलं?????”
“हेच ….की तो आहे….इथेच आहे ….आपल्या डोंबिवलीत”
“बास !!!….😫”
“बाय…..😂”
“………..”
क्रमशः……😊
#सातएकावन्नडोंबिवली