आता प्लॅटफॉर्म बऱ्यापेकी भरलेला.
ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली तशी बायकांनी पदर खोचला, ओढण्या बांधल्या, पुरुषांनी सॅक पुढे लावली. त्या गर्दीत विनोद आणि प्रीतीही मिसळून गेले.
विनोदने जवळजवळ धावती ट्रेन पकडून आत जाऊन सीट मिळवली. आता दादर येईपर्यंत चिंता नाही…. गेम खेळा , laptop उघडून काम करा नाहीतर सरळ झोपा….. काहीही करायला स्कोप होता. एक तासाची निश्चिंती!!
प्रीतीने मात्र सगळ्या घाई घाई करणाऱ्या बायकांना चढू दिलं…. आणि सगळ्यात लास्ट चढून डोअर मध्येच उभी राहिली. ही तिची नेहमीचीच सवय होती. तिला ठाण्याला उतरायचं असायचं त्यामुळे फक्त अर्ध्या तासासाठी काय बसायचं???? म्हणून तिने मोबाईल मध्ये एफ एम लावून कानात हेडफोन घुसवले.
ट्रेन हलली …तशी जेन्ट्स डब्यातून गणरायाला जोरदार साद घातल्या गेली. त्या आवाजाला इतर सर्व डब्यातून अगदी महिलांसकट ‘मोssssssर याssssssss’ असा प्रतिसाद मिळाला.
या नंतर थेट मुलुंड स्थानकात ट्रेन शिरल्यावर गणरायाची आळवणी होणार असते…..नेहमीच.
ठाणे आलं तशी प्रीती उतरली. डोंबिवली ते ठाणे पूर्ण प्रवासात सकाळचा प्रसंग तिच्या डोक्यातून जातच नव्हता. त्याला एकदा शेवटचं सॉरी आणि thanks बोलायला हवं. तो कुठे उतरतो हेही तिला माहीत नव्हतं. कदाचित तोही ठाण्याला उतरला असेल तर????🤔
तसा ड्रेसिंगवरून आणि अंदाजे वयावरून तरी नोकरी करणारा वाटला….
मग ठाण्याआधीच उतरला असेल तर ???? 🤔
नाही नाही….. साधारण कंपन्या ठाण्याच्या पुढेच आहेत…
दिवा मुंब्रा तर शक्यच नाही…
पण कळवा मध्ये वगरे काम करत असेल तर???? 🤔छे छे!!!!
असे तिचे विचार सुरु असतांनाच गाडी सुटली….
उतरला असेल तर स्टेशन वर भेटेल…नसेल तर आता जाणाऱ्या गाडीत कुठे दिसतोय का पाहू म्हणत थोडं लांब उभं राहून जेन्ट्स डब्याकडे बघत ती काही क्षण तिथेच रेंगाळत उभी राहिली…..
इकडे विनोदला सुद्धा ठाण्याला विंडो सीट मिळाली …आणि सहज खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्याला ती ट्रेन कडे बघत उभी असलेली दिसली. पण तितक्यात ट्रेन फास्ट झालेली त्यामुळे तिला बाय करता नाही आलं.
ती का थांबलेली???? 🤔आय मीन कुणासाठी थांबली असेल????🤔
मला शोधत असेल का????🤔
कि तिची एखादी मैत्रीण मागच्या लेडीज मध्ये चढली असेल???🤔
की गर्दीत तिची पर्स किंवा घड्याळ मारलं असेल कुणी????
की गाडी पूर्ण स्टेशन बाहेर जायची वाट बघून मग पुढे जाणार असेल?????🤔
त्याच्याही डोक्यात प्रश्न जमा झाले…..
नंतर त्याच्या लक्षात आलं…
“यार! आपण का हिचा एवढा विचार करतोय???”आणि मग पुन्हा त्याने गेम सुरु केला.
ऑफिस मध्ये आज त्याची मेन क्लाएंट मिटींग होती. आता पर्यंत ज्या प्रोजेक्ट वर काम केलं त्याचं प्रेझेन्टेशन…. डेमो……सर्वच एकत्र. तो, त्याचा कलीग कौस्तुभ आणि बॉस….यांनी आधीच सर्व तयारी केली होती… पोचल्या पोचल्या बॉसने दोघांना केबिन मध्ये बोलावलं… कॉफी घेत घेत बुलेट पोईट वर डीस्कशन झालं.
बाराला मिटींग ठरलेली…ती साडे बाराला सुरु झाली आणि जवळ जवळ ५ पर्यंत सुरु होती. … सर्व झाल्यावर विनोद आणि कौस्तुभ…. थोडा राउंड मारून येतो सर …चहा पण बाहेर घेतो असं बॉसला सांगून बाहेर फेर फटका मारायला निघाले. दोघांचं काम परफेक्ट झाल्याने बॉसही काही बोलले नाहीत.
बाहेर पडल्यावर जवळच्याच एका टपरीवर कौस्तुभने एक सिगरेट आणि विनोदने चहा मागवला….
“काय रे आज सात एकावनला नाही आलास??? मी थांबलो असतो पण आज laptop होता म्हणून ती सोडली नाही.” कौस्तुभ म्हणाला.
“हो रे… यायचं होतं…. पण पार्किंग नव्हती मिळत..ते शोधण्यात दहा मिंट गेली ”
“यार डोंबिवलीत सगळं आहे…पण जागा नाही….कोणतही गव्हर्न्मेंट येऊ दे…बाइकर्सचा विचार कोणीच करत नाही मायला…..???? .”😣
“जाऊ दे यार…. …पोलिटिक्सचा topicच नको…डोकं फिरतं….आता मस्त डेमो झालाय…. फ्रेश वाटतय….”
“मग तू लावलीस कुठे गाडी????”
“रेल्वे पे and पार्क.”
“पे and पार्क?????अरे तिकडे कशाला लावलीस???? ते लोक वाट लावतात गाडीची….. ”😣
“माहित्ये यार….. पण आज शिव मंदिर रोड पण pack होता ,… लोक कशीही सोडून जातात….मग एक जागा केली कशीबशी……तर तिथे सरळ मागून येऊन एका मुलीने तिची स्कुटी घुसवली….”
“अरे असं कसं घुसवली😠???? तू का घुसवू दिलीस????तिला बोलायचं न…..😠 ”
“अरे झालं सगळं बोलून पण…… जाऊ दे मला सेफ मिळालं पे and पार्क मध्ये ”
“सेफ????? हाहाहाहा😂😂 तू त्या मुलीची डायरेक्ट वकिली करतोयस बॉस….. ”
“नाही रे….. ती मला सॉरी पण बोलली…आणि……”
“आणि तू तिला माफ केलस😱😱😱???????अनबिलीवेबल…..लास्ट टाईम एकदा चुकून तुझ्या पी डी मधला मूव्ही डिलीट झालेला माझ्या कडून…. तेव्हा पासून तू मला पीडी देत नाहीस….आणि हीला डायरेक्ट फुकट पार्किंग दिलस😳😳???? हाहाहा😂😂😂…..क्या ब्बात क्या ब्बात !!”
“अरे……. म्हणजे……. तसं काहीच नाही…तू उगाच काहीही अर्थ काढतोयस……चल तुला आता हवाय का पीडी ???? बोल आत्ता देतो….“
“हाहाहा 😂😂😂…… कुछ तो गडबड हे दया.ssssssss😬 कुछः तो गडबड हे…😬”
“अर्रे……🙄”
“चल ….चल……बता दे……
“क्या बताऊ???? कुछ हेही नही…..”
“अपने डोंबिवलीकी हेना????”
“अर्र्रे…..किधर से किधर कनेक्शन लागा रहा तू????”
“चल नाम बता….दिसायला कशी होती???? .”
“नही पता…..अर्रे मेरे भाई….फक्त पार्किंग बद्दल बोललो आम्ही…in fact भांडलो .”
“यार कसाय तू😣….. लडकी सामनेसे आके स्टोरी शुरू कर रही हे…..ओर तू आते हुये लक्ष्मीको ना बोल रहा हे….”
“हाहाहाहा😂😂😂 ये कुछ जादा होरा……… तू लाईट पेक्षा जास्त फास्ट आहेस कुस्त्या…….. ”
“yes of course…. मेरा दिल केह रहा हे…..आगे जाके तेरा ओर उस लडकिका पार्किंग कॉमन होने वाला है…….. देख तू…😎.”
“मतलब?????🤔”
“हाहाहा…😂😂😂.. चल ऑफिसला जाऊ…..बॉसुडी थांबला असेल आपल्यासाठी..……”
“कुछभी यार तू…..देख मेरे घरपे पेहलेहि लव्ह म्यारेज पसंद नही हे…”
“अरे तो वो अरेंज करवायेंगे…इतनी दुरकी मत सोच……अच्छा चल फक्त नाव सांग ….आपण फेसबुकवर शोधू… ”
“नाही नाही ….ऑफिस मध्ये उगाच बाकीच्यांना चर्चा करायला नको…..”
“अssssssच्छा….ठीके मग मोबाईल मध्ये बघूया…..”
“छोड न यार तू……”
“ओके बॉस…… नाही चिडवत…. ठीके???? मला फक्त नाव सांग तिचं…. मी इन्फो काढेन.🙃”
“प्रिया देसाई होतं वाटतं……..की प्रीती???…. नाही प्रियाच ….पण … देसाई की देशपांडे आठवत नाहीये…..”
“यार तेरी तरह …भाभिका नाम भोत कॉमन हे …….प्रिया डाला तो लाखो प्रिया मिलेंगी…..”
“छोड फिर…..कल पूछेंगे उसे…”
“कल?????वो कैसे?????😲”
“बघ….पहिलेच सांगतो…….चिडवायच नाही……ती रोज सात एकावन्न पकडते……”
“अर्र्र्रेरेरेरेरेरेरे……🤠🤠…….सही ना…म्हणजे पार्किंग सोडून बरीच माहिती आहे तर ..….”
“एवढीच!!!!!….. आणि हा….एक प्रश्न….. काय बोलायचं तिच्याशी????हार्डली एक दिवसाची ओळख…”
“तू चल बॉस…..बाकी उद्या ठरवू. सात एकावन्न काय????????😆😆😆”
क्रमशः ☺
#सातएकावन्नडोंबिवली