सर्व भक्तांना भिकारदास मारुती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा ! आजच्या पोस्ट ला असे शीर्षक का दिले असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की, इतक्या विविध नावांनी भगवान हनुमानाला ओळखले जाते आणि एवढ्या विविध नावांची मंदिरे भारतात आणि विशेषतः पुण्यात आहेत, त्या पैकी ‘भिकारदास मारुती’ हे माझे अत्यंत लाडके नाव आहे. याचं कारण असं…
जागतिक पुस्तक दिन
आज २३एप्रिल, जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन व मृत्यूदिन आणि जागतिक पुस्तक दिन देखील. आजची तरुण पिढी वाचत नाही, वाचन संस्कृती कमी झाली आहे, पुस्तकं वाचकांविना झाली पोरकी या सर्व निबंधक विषयांवर लिहिण्यापेक्षा मी या पोस्ट मार्फत काही अतिशय वाचनीय आणि स्मरणीय पुस्तकं सुचवण्याचा प्रयत्न करते आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील मला आवडलेली पुस्तकं या यादीत…
राम राज्य
आपण सारे भारतीय किती भाग्यवंत आहोत की ज्या भूमीत त्रिखंडात कीर्ती असणारं राम राज्य होऊन गेलं, त्या भूमीला आपण आपली मायभूमी म्हणतो. आणि ज्या भूमीवर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने पाऊल ठेवले, ज्या भूमीवर त्याचा वावर झाला, त्या या भारतभूमीला मातृस्थानी मानण्याचा अभिमानास्पद अधिकार आणि ते सौभाग्य विश्वनिर्मात्याने केवळ आपल्याला दिले आहे. कारण, अधर्माचा विनाश करणारा आणि…
मंदिर की हॉस्पिटल?
सरकारने कशावर लक्ष केंद्रित करावं? मंदिर की हॉस्पिटल? या विषयावर माझी आजची पोस्ट. गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल्स ची कमतरता असो की कोरोनाचे वाढते प्रमाण असो, काहीही कारण असले तरी खापर मात्र मंदिरांवर फोडले जात आहे. सतत येणारे विनोदी मेम्स, आणि त्या मागची मानसिकता याचा काही ताळमेळ बसेना म्हणून आज यावर थोडं मत मांडत आहे. काही…
महिला दिन
आज जागतिक महिला दिन. आणि त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक शुभेच्छा मिळाल्या. खरंतर महिला म्हणून जन्माला येऊन मला वेगळा असा काय फायदा झाला? त्याचा विचार करत इतर महिलांना शुभेच्छा पाठवल्या. दिवस रोजचाच फक्त शुभेच्छा वेगळ्या. २१ व्या शतकात आज देखील स्त्री – पुरुष समानता अस्तित्वात नाही आणि स्त्री ला दुय्यम वागणूक दिली जाते ह्याचे अनेक पुरावे आहेत. …
इतिहासकार सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर ! कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास हा (माझ्याकरिता कंटाळवाणा ) विषय देखील मनापासून आवडू लागला. आणि एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच त्यांचे एक इतिहासकर म्हणून आपल्या मराठी साहित्य…
गांधी हत्या
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात तर नथुराम समजू लागलेले लोक त्याला देशभक्त मानतात. आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत आणि नथुराम गोडसे देखील नाही. आणि या घटनेकडे तटस्थपणे…
आसामी खाद्यसंस्कृती
आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या आपल्या या देशातील खाद्य संस्कृती मध्ये देखील कमालीची विविधता आहे. भारतात प्रत्येक घरात असतो तो मसाल्याचा डब्बा. त्यातली सामग्री देखील सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखी असली तरीही…
पराक्रम दिवस
मोदी सरकारनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण व उत्तमोत्तम निर्णयांपैकी सर्वोच्च कोणता निवडायचा झाला, तर तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतिथी ‘’पराक्रम दिवस’ या नावाने या साजरी करण्याचा. आणि आज २३ जानेवारी, नेताजींची १२५ वी जयंती, अर्थात ‘पराक्रम दिवस’. भारतीय सैन्य दिवसप्रमाणे आजचा ही दिवस साजरा करण्याचा… देशाचं ‘स्वातंत्र्य ’ या एका वेडापायी या माणसाने…
तैमुरलंग
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यानंतर अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमुर नाव ठेवल्यावर टीकादेखील केली होती. त्या वेळी मला तैमुरलंग या मध्य युगातील ऐतिहासिक व्यक्ती बद्दल कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे त्या टीकेचे कारण नीटसे समजले नव्हते. पण गेल्या काही महिन्यांपासून…