Skip to content

Frankly Speaking

By Kimaya Kolhe

Menu
  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
Menu
भारत बायोटेक कोविड वॅक्सीन

भारतीय वॅक्सीन

Posted on January 6, 2021January 6, 2021 by Kimaya Kolhe

भारतीय वॅक्सीन लवकरच उपलब्ध होण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर देशात चर्चेला उधाण आलं आहे. आणि वॅक्सीन बद्दल सध्या देशात जे काही राजकारण सुरु आहे त्याची अक्षरशः कीव करावीशी वाटते.

A decisive turning point to strengthen a spirited fight!

DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and COVID-free nation.

Congratulations India.

Congratulations to our hardworking scientists and innovators.

— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021

“मोदींचं वॅक्सीन आम्ही लावून घेणार नाही”, असं म्हणणारे विरोधी पक्षातले नेते, मोदींच्या तिरस्कार करण्यात एवढे आंधळे झाले आहेत की, स्वतःच्या वक्तव्याने आपण आपल्याच देशातील वैज्ञानिक, डॉक्टर्स ,उद्योजक व इतर लोक, जे या वॅक्सीन बनण्याच्या प्रक्रियेत गेले अनेक महिने अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांचा , त्यांच्या ज्ञानाचा व कष्टाचा देखील अपमान करीत आहोत, हे देखील त्यांना कळेनासं झालं आहे.

आज जगभरातील वैज्ञानिकांनी, भारतातील वॅक्सीन वर विश्वास दाखवून त्याची मागणी केली आहे, त्याचं प्री बुकिंग करायला देखील तयारी दर्शवली आहे, अशा या घटना, आपल्या देशाचा जगभरात गौरव वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत.

आणि तरीही, आपल्याच देशात, आपल्याच लोकांकडून अतिशय विकृतपणे, घाणेरडं राजकारण करण्याच्या नादात, या  वॅक्सीन बद्दल, सामान्य नागरिकांमध्ये भ्रम निर्माण व्हावा म्हणून, युट्युब चॅन्नेल्स, इन्स्टा वर काही व्यक्तींकडून असे व्हिडियो बनवले जात आहेत. 

बरं, भ्रम निर्माण करणे , लोकांमध्ये भीती पसरवणे यात तर, या लोकांना कुणी मागे टाकूच शकणार नाही. कारण त्यांचं वक्तव्य कुठला थर गाठेल याची काही शाश्वती नाही.

उदाहरणार्थ, हे वॅक्सीन घेतल्यावर माणूस नपुंसक होतो , अपंग होतो, काहीतरी व्यंग निर्माण होतं, हे वॅक्सीन गुप्तांगातून दिल्या जातं, स्त्रिया पुन्हा आई होऊ शकणार नाहीत अश्या अत्यंत खोट्या, कसलाही आधार नसलेल्या, मूर्ख अफवा पसरवून लोकांमध्ये  आतापासूनच वॅक्सीन बद्दल घृणा व भीती निर्माण करीत आहेत. 

‘भारत बायोटेक’ या भारतीय कंपनीचे सीईओ, यांना  ‘मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, माझ्या कुटुंबात देखील कुणी राजकीय पक्षातील नाही’ असं जाहीर करावं लागलं. हे खरोखर दुर्दैव आहे. 

मायक्रोसॉफ्ट चे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी देखील कोरोना वॅक्सीन संशोधन व निर्मिती बाबतीत भारताचं समर्थन केलं आहे व एका मुलाखतीत ते म्हणाले की , “भारताकडे  एवढी क्षमता आहे की , फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी कोविड -१९ वॅक्सीन चा ते पुरवठा करू शकतात.भारतीय औषध उद्योग क्षेत्रांत तेवढी क्षमता नक्कीच आहे. केवळ, वॅक्सीन तयार करण्यासाठी नाही, कोरोनाशी संदर्भात संशोधनात देखील भारतीय वैज्ञानिक व औषध कंपन्यांनी जगाला मोलाची मदत केली आहे ”

वॅक्सीनच्या पुढील प्रक्रियेची घोषणा नुकतीच पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर देखील जगभरातून भारताचे कौतुक केले गेले आहे. भारतीय वॅक्सीनची मागणी केली याचा दुसरा अर्थ भारतीय वॅक्सीनवर विश्वास देखील दाखवला आहे, हे देखील नमूद करायला हवं. नाही का?

It’s great to see India’s leadership in scientific innovation and vaccine manufacturing capability as the world works to end the COVID-19 pandemic @PMOIndia https://t.co/Ds4f3tmrm3

— Bill Gates (@BillGates) January 4, 2021

हे शब्द तर क्रिकेट मधील एखाद्या विश्वचषका पेक्षा देखील मूल्यवान आहेत, असं मला वाटतं.

सावरकरांच्या ‘ने मजसी ने’ या काव्यात, एक सुंदर कडवं आहे बघा,

गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे!
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थभार विद्येचा!

मी गुण सुमने वेचियली , मी जे काही शिकलो, जे  ज्ञान संपादन केले ते कोणासाठी? माझ्या मातेनी त्याचा सुगंध घ्यावा, यासाठी. माझ्या ज्ञानाचा  गुणांचा फायदा तिला व्हावा यासाठी.

पण जर ह्या ज्ञानाचा वापर , माझ्या मातृभूमीसाठी (तिच्या उद्धारासाठी) होणार नसेल, तर ती विद्या म्हणजे केवळ भारच आहे आणि तो देखील व्यर्थ आहे.

एवढ्या सुंदर ओळी, आणि त्याला साजेसं काम आज आपले वैज्ञानिक करत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग जर आपल्या देशासाठी होत आहे, किंबहुना भारतमातेचा गौरव जगभरात होणार आहे, तर त्या सर्व भारतीयांना आपण सलामच करायला हवा.

परंतू, आपल्याच देशातील काही लोकांना हे कळत नाही, किंवा कळून घ्यायचं नाही. स्वार्थ आणि राजकारण यापलीकडे त्यांना दृष्टीच नाही.

‘आमचं  वॅक्सीन वाईट आहे, ते मी लावून घेणार नाही ’ असं म्हणून अविश्वास दाखवणारे  स्वकीय , हे आपसूकच विदेशी कंपनीला फायदा करून देत आहेत, हे साधं गणित देखील कुणाला कळू नये? हे विरोधक, जगासमोर भारताच्या प्रतिमेला देखील डाग लावताहेत.

आता पर्यंत या वॅक्सीन बद्दल मला अशा आशयाचे अनेक मेसेज आले. सोशल मिडिया तर अशा गोष्टींना भरभर पसरवण्याचा एक राजमार्गच झाला आहे. पण मेसेज पुढे पाठवण्या आधी, एवढा साधा विचार एक भारतीय म्हणून कुणी का करत नाही?

बरं राग मोदींचा आहे नं? पण  वॅक्सीन कधी घ्यायचं, किती घ्यायचं हे मोदींच्या हातात कुठे आहे? ते सर्वतोपरी या क्षेत्रांत राबणारे, वैज्ञानिक व डॉक्टर्स ठरवणार  आहेत. त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने ते सर्व निर्णय घेतीलच. पण  त्याची पुरेशी व नीटशी माहिती नसतांना ते न घेण्याचा अट्टाहास का ? 

आपले वैज्ञानिक मूर्ख आणि राहुल गांधी, अखिलेश यादव हे पंडित? 

Truly, as long as opposition consists of guys like @RahulGandhi and @yadavakhilesh, @narendramodi ji need not worry! pic.twitter.com/XBbKumrqsZ

— Shefali Vaidya. (@ShefVaidya) January 6, 2021

जेव्हा संशोधन सुरु होतं तेव्हा प्रश्न , “आपलं सरकार काय करत आहे? बाकी देश बघा, तयारी करीत आहे. त्यांचं वॅक्सीन आपल्याला घ्यायला लावणार, महाग पडणार  ”

आता भारतात वॅक्सीन बनलं आहे, २ टेस्टिंग च्या प्रकिया यशस्वी झाल्या आहेत, आणि आता सगळीकडून मागणी देखील आहे, तर मग म्हणतात ,”आम्ही बीजेपी चं वॅक्सीन  घेणार नाही”

अरेच्चा !! काय म्हणायचं या मूर्ख राजकारण्यांना ?

कोरोना वर वॅक्सीन बनो नं बनो, पण देशातील अशा वैचारिक दारिद्रयावर वॅक्सीन कधी बनायचं?

 

 

Sharing is caring 🙂

  • WhatsApp
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Reddit
  • Pinterest

Related

3 thoughts on “भारतीय वॅक्सीन”

  1. Nileema says:
    February 10, 2021 at 2:04 PM

    True fact !!! This is mere shameful and immature mind set. There are various things where People play mind games with normal people.

    Reply
  2. Janmjanhavi says:
    January 6, 2021 at 4:15 PM

    Here economical condition of every individual is going down, but the hope which giving us to start a new day is truly the launching of our own vaccine….kimaya 👍👍

    Reply
    1. Mayura says:
      January 6, 2021 at 10:28 PM

      अगदी खरय, ह्या घाणेरड्या मानसिकतेवरच औषध शोधायला हवं आधी 👍🏻

      Reply

I would appreaciate hearing your thoughts on this.Cancel reply

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 64 other subscribers

You may also like :

  • सात एकावन्न डोंबिवली भाग ४
  • सात एकावन्न डोंबिवली- भाग ३
  • सात एकावन्न डोंबिवली भाग २
  • सात एकावन्न डोंबिवली -भाग १
  • गीता जीपीटी
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
© 2025 Frankly Speaking | Powered by Superbs Personal Blog theme