व्यासांनी महाभारतात अनेक उत्तमोत्तम पात्र रचली. प्रत्येकाचा त्या नाट्यातील भाग कमी अधिक प्रमाणात महत्वाचा ठेवला. व्यासांच्या महाप्रतिभेचा महाअविष्कार समजलं जाणारं हे महानाट्य … त्यातील माणसं त्यांनी अशी काही उभी केली, कि केवळ एका दृष्टीत किंवा एका वाचनात देखील ती खोलवर समजत नाहीत. ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात, प्रत्येक वेळी नव्याने कळू लागतात आणि तेव्हाच ती…