काही काही वेळा पुस्तकं एकाच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतात. अर्थातच त्या मागे त्या लेखकाचा त्या गोष्टीमागचा अभ्यास, संशोधन, त्याचे विचार, त्याने आत्मसात केल्यानंतर त्यातल्या प्रक्षिप्त गोष्टी या आल्याच. पण त्यानिमित्ताने, विशेषकरून इतिहासाकडे निर्भेळ दृष्टीने बघायला आपण शिकायला हवं हे मला कालांतराने जाणवू लागलं. आणि म्हणूनच, माझ्या मनात ठाम विचार असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही लेखन आढळल्यास…