आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या आपल्या या देशातील खाद्य संस्कृती मध्ये देखील कमालीची विविधता आहे. भारतात प्रत्येक घरात असतो तो मसाल्याचा डब्बा. त्यातली सामग्री देखील सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखी असली तरीही…